Mumbai : मराठा समाजाला दिलेले आरक्षण वैध ; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

एमपीसी न्यूज- मराठा समाजाला नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा राज्य सरकारने केलेला कायदा वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्ती भारती डोंगरे आणि रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. फडणवीस सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण दिलं. मात्र त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. याबाबत विविध युक्तिवाद झाल्यानंतर आता हायकोर्टातर्फे अंतिम निर्णय देण्यात आला. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे या निकालाकडे लक्ष लागलेले होते. मराठा आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयात चार याचिका विरोधात आणि दोन याचिका समर्थनार्थ दाखल झाल्या होत्या. एकूण 22 हस्तक्षेप अर्ज दाखल झाले होते. ज्यामध्ये 16अर्ज आरक्षणाच्या समर्थनात तर 6 अर्ज विरोधात होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.