Pune : एनएसएस विद्यार्थ्यांकडून पहाटे वारकऱ्यांना चहाचे वाटप

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी शुक्रवारी (दि. 28) पहाटे साडे पाच वाजता वारकऱ्यांना चहाचे वाटप केले.

दिवसभर आणि रात्री झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर वारीवर प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे मिळालेला गरम चहा हा सुखद धक्का ठरला. आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शैला बुटवाला, मन्सूरा पठाण, डॉ. एल. के. सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम भवानी पेठ, पुणे कॅम्प परिसरात पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.