Pimpri : पिंपरी न्यायालयात 104 खटले निकाली

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने  यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी न्यायालय तसेच आकुर्डी मनपा न्यायालय महालोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते.  त्यात 104  दावे निकाली काढण्यात आले.

यावेळी पिंपरी न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश  मे. के. एम. पिंगळे  व अन्य न्यायाधीश उपस्थित होते. तर आकुर्डी न्यायालयामध्ये  मे. माधुरी खनवे उपस्थित होते. यावेळी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अतिश लांडगे  व प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक अॅड. सुनील कड तसेच पिंपरी-चिंचवड अॅड. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी अॅड.  अतिश लांडगे  यांनी लोकन्यायालयाचे महत्व सांगितले. ते म्हणाले,  पक्षकारांना लोकन्यायालयामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त खटले निकाली काढा असे आवाहन करण्यात आले.  तर अॅड. विलास कुटे यांनी देखील पक्षकार व वकिलांना मार्गदर्शन केले. विधी सर्व मार्फत राबविल्या जाणा-या लोकन्यायालय या संकल्पनेचा उपयोग करा असे आवाहन अॅड. सुनील कड  यांनी केले. तर पिंपरी अॅडव्होकेटस बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर यांनी सांगितले, जास्तीत जास्त दावे निकाली काढण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकन्यायायमध्ये  पिंपरी  न्यायालयाचे  104 दाखल खटले निकाली लागले तर  व 33  प्रिलीटिगेशन म्हणजेच दाखलपूर्व खटले निकाली निघाले. त्यात   8, 01, 00,106 एवढ्या रकमेचे होते तर  प्रिलिटिगेशन म्हणजेच   दाखलपूर्व खटले  33 निकाली निघाले त्याची रक्कम एकूण 4,63,269 रुपये एवढ्या रकमेचे होते.

या लोकन्यायालयामध्ये  पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार  असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, अॅड. अतिश लांडगे,  अॅड. सुदाम साने, अॅड. संजय दातीर पाटील, अॅड. प्रदीप ढोले, अॅड. ज्ञानेश्वर होलगोली, अॅड. गणेश शिंदे, अॅड. प्रतिभा शिंदे, अॅड. सूरज खाडे, अॅड. अतुल अडसरे,  अॅड. सुनील कड, अॅड. किरण पवार, अॅड. उमेश जाधव, अॅड. जॉर्ज डिसुजा, अॅड. योगेश थंबा आदी उपस्थित होते.

पॅनल परिक्षक म्हणून अॅड. मोनिका  गाढवे, अॅड. सुषमा वासने, अॅड. अंकुश गोयल, अॅड. अंतरा देशपांडे, अॅढ. शिवाजी महानवर, अॅड. कुसुम पुलसे, अॅड. संगीता कुशालकर, अॅड. केशव घोगरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. योगेश थंबा यांनी केले. तर आभार  अॅड. तुकाराम पडवळे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.