Pune : भारतीय विद्या भवन’मध्ये शुक्रवारी मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम, कथकचा नृत्याविष्कार

एमपीसी न्यूज- ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ मोहिनीअट्टम ,भरतनाट्यम ,कथकचा नृत्याविष्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लक्ष्य ‘ या नावाचा हा कार्यक्रम शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सहकार्याने होणार आहे .

शुक्रवारी (दि. 5 ) संध्याकाळी 6 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्य गुरु मंदाकिनी त्रिवेदी मोहिनीअट्टम सादर करणार आहेत, श्रुती टेकवडे भरतनाट्यम तर अमृता गोगटे कथक सादर करणार आहेत.

‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा ७८ वा कार्यक्रम असून सर्वांसाठी खुला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.