Talegaon Dabhade : शिरगाव- परंदवडी पोलीस दूरक्षेत्र चौकीचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज- कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी ग्रामीण भागातील शिरगाव- परंदवडी येथे नव्या पोलीस दूरक्षेत्र चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केले. पवन मावळात परंदवडी येथे सुरु होत असलेल्या शिरगाव -परंदवडी पोलीस चौकीच्या उदघाटन प्रसंगी पद्मनाभन बोलत होते.

यावेळी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, नारायण पवार, तहसीलदार शरदचंद्र माळी, नायब तहसीलदार चाटे, सरपंच मालन चव्हाण, उपसरपंच वसंत पापळ, पोलीस पाटील शरद पवार, पाटील संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे व सहकारी, आदीसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

या पोलीस चौकीच्या अखत्यारीत चांदखेड, दारुंब्रे, उर्से, आढे, आढले, शिरगाव, ओझर्डे, गोडूंब्रे, सांगवडे, पुसाणे, पाचाणे, कुसगाव(प.मा), बेबडओहळ, गहुंजे,आढले (बु), धामणे, साळुंब्रे, परंदवडी आदि गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. तक्रारदारांना त्वरित मदत व सहकार्य लाभावे असे आयुक्त पद्मनाभन यांनी सांगितले. या पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन पोलीस पाटील दत्तात्रय माळी यांनी केले. आभार उपसरपंच वसंत पापळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.