Maharashtra corona Update : राज्यात आज 10,441 नव्या कोरोना रुग्ण तर 8,157 जणांना डिस्चार्ज

10,441 new corona patients in state today, 8,157 persons discharged.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 10 हजार 441 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 8 हजार 157 बरे झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्य आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 6 लाख 82 हजार 383 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 लाख 88 हजार 271 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1 लाख 71 हजार 542 सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात आज 258 रुग्णांचा मृत्यू झाला.  राज्यातील मृत्यूदर 3.26 टक्के एवढा आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असून राज्याचा रिकव्हरी रेट हा 71.55 टक्के झाला आहे.

राज्यात आजवर तपासण्यात आलेल्या  36 लाख 16 हजार 704 नमूण्यापैकी 6 लाख 82 हजार 383 सकारात्मक आढळले आहेत.  राज्यात 12 लाख 30 हजार 982 जण होम क्वारंटाइन आहेत तर, 34 हजार 820 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.