Pune : पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ ; पेट्रोल 78.39 तर डिझेल 68.64

एमपीसी न्यूज – पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क आणि उपकरामध्ये प्रत्येकी एक रुपयांची वाढ आणि प्रतिलिटर एक रुपया अधिभार लावण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये काल मध्यरात्रीपासून वाढ करण्यात आली आहे. पुणे शहरात पेट्रोलचा भाव 76 रुपयांवरून 78 रुपये 39 पैसे झाला आहे तर डिझेल 66 रुपये 20 पैशावरून 68 रुपये 64 पैसे दराने विकले जात आहे. या दरवाढीचा एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून, सर्वसामान्यांच्या खिशावरही त्याचा भार पडणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी पेट्रोल-डिझेलच्या अतिरिक्त करात प्रत्येकी एक रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोल सुमारे अडीच रुपयांनी, तर डिझेल 2 रुपये 40 पैशांनी महागले आहे.

मागील काही दिवसांपासून ऐंशी रुपयांच्या खाली असणारे पेट्रोलचे दर पुन्हा ऐंशीच्या घरात पोहोचतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या इंधन दरवाढीचा परिणाम वाहतुकीवर होऊन, पर्यायाने महागाई वाढण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.