PimpleSaudagar : सनशाईन सोसायटीत ओला कचरा विघटन व खत निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील प्रभाग क्र 28 येथील सनशाईन गृहनिर्माण सहकारी संस्था या सोसायटीच्या दैनंदिन ओला कचरा विघटन व खत निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन आज (दि. 6) नगरसेवक विठल उर्फ नाना काटे व नगसेविका शीतल काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

साधारण एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात कचऱ्याचे विघटन करून खत निर्मिती करण्यात येते. सनशाईन सोसायटीमध्ये एकूण 125 बंगलो सदनिका आहेत. सोसायटीतील सर्व नागरिक या उपक्रमात योगदन देत आहेत, याचे नगरसेवक नाना काटे व शीतल काटे यांनी कौतुक केले. असा खत निर्मिती प्रकल्प परिसरातील सर्व सोसायट्यानी राबवावा असे आव्हान करण्यात आले.

सोसायटीच्या वतीने नाना काटे व शीतल काटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष प्रवीण बालन, सचिव काकासाहेब सानप, प्रवीण तिवारी, राजेश गायकवाड, डॉ. भास्कर शेजवळ, पावन झोपे, महेश सावंत, पवन मेडीपटला, वसंत सहारे, तृप्ती सावंत, भार्गवी मेडीपटला आदी सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.