Chinchwad : ‘क’कॅलीग्राफी कार्यशाळेत रंगले आबालवृद्ध

Chinchwad : चिंचवडला रंगली ‘क’कॅलीग्राफी कार्यशाळा

एमपीसी न्यूज – ‘क’कॅलीग्राफी सुंदर अक्षरांची कार्यशाळा यांच्या वतीने प्रभाग क्र. १८ मध्ये अक्षरांची कार्यशाळा भरवण्यात आली. या कार्यशाळेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नागरिकांना, मुलांना पेंटिंगची आवड लागावी तसेच आपल्याच हाताने केलेल्या कलाकृतीचा आनंद मिळावा अशा अनेक उपयुक्त कल्पना घेऊन हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी कार्यशाळेत एक छत्री स्वतः रंगून कार्यशाळेची सुरवात केली.

तीन तासाच्या या कार्यशाळेत स्पर्धकांनी अत्यन्त उत्कृष्ट छत्र्या पेंटिंग करून मनसोक्त आनंद घेतला. मधुकर बच्चे यांनी या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले. या कार्यशाळेतील पेंटिंग बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी
भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे,तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

‘क’कॅलिग्राफी या संस्थेचे प्रमुख शरद कुंजीर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. सद्स्य अर्चना कुंजीर यांनी सर्व प्रमुख अतिथी व स्पर्धकांचे स्वागत व आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.