BNR-HDR-TOP-Mobile

Maval: पवना धरण 36 टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात 36.65 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 115 मिमी पाऊस झाला आहे. 1 जूनपासून पाणलोट क्षेत्रात 968 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, पाणीसाठ्यात वाढ होत असली. तरी, महापालिकेने सावध पाऊले टाकत तुर्तास पाणीकपात रद्द केली नाही.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. यंदा महापालिकेने टप्पा-टप्प्याने पाणी कपात केली. पहिल्यांदा आठवड्यातून एकदा तर त्यामध्ये वाढ करत एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला.

यंदा पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा सर्वांत कमी म्हणजेच 13 टक्यांवर आला होता. पावसाला विलंब होत असल्याने महापालिकेने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. परंतु, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असली. तरी, एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरुच ठेवला आहे. धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यावर पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.