BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची जबाबदारी  डॉ. देशमुख तर भोसरीची डॉ. जाधव यांच्याकडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे भोसरीतील 100 खाटांचे आणि पिंपरीतील 100 खाटांचे अद्यावत असलेले जिजामाता रुग्णालय सुरु करण्याच्या अंतीम टप्यात आहे. दोन्ही रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी अधिका-यांच्या नियुक्त्या केला आहेत. वायसीएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे संपुर्ण जिजामाता रुग्णालयाचे तर वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांच्याकडे भोसरीतील रुग्णालयाची जबाबदारी दिली आहे. रुग्णालय प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली असून दोन्ही रुग्णालये लवकरात-लवकर सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांना दिले आहेत. 
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सात मोठी रुग्णालये आणि 25 पेक्षा अधिक दवाखाने सद्यस्थितीत कार्यरत आहे. नव्याने प्रस्तावित भोसरीतील 100 खाटांचे आणि पिंपरीतील 100 खाटांची संख्या असलेले अद्यावत जिजामाता रुग्णालय सुरु करण्याच्या अंतीम टप्यात आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापन मोठ्या स्वरुपाचे आहे. त्याचे नियंत्रण व सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने महापालिकेतील वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे आवश्यक होते.

रुग्णालयीन कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने वायसीएमएचचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांच्याकडे संपुर्ण जिजामाता रुग्णालयाचे कामकाज तर वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. शंकर जाधव यांच्याकडे भोसरीतील रुग्णालयाची सोपविण्यात आली आहे. दोघांनीही नव्याने अद्ययावत निर्माण होणारी रुग्णालये लवकरात-लवकर सुरु करण्याची कार्यवाही करावी.

रुग्णालयांच्या कामकाजाचे नियोजन, रुग्णालय सक्षमीकरण आणि अपुर्ण कामे संबंधित विभागाशी समन्वय साधून तातडीने पुर्ण करुन घ्यावीत. यासह सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या भोसरी व जिजामाता रुग्णालयाचे रुग्णालय प्रमुख म्हणून कामकाज करावे. रुग्णालय प्रमुख या पदांना वेळोवेळी सोपविण्यात आलेले सर्व अधिकारी वापरावेत. डॉ. देशमुख यांची आस्थापना जिजामाता रुग्णालयात तर डॉ. जाधव यांची भोसरी रुग्णालयात करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2

.