Pune : सानिका ढाकेफळकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज- चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण पदवी वगैरे न मिळवता उत्तम चित्रे साकारणाऱ्या सानिका ढाकेफळकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन पुण्यात औंध येथील पु ना गाडगीळ अँड सन्स यांच्या कालादालनामध्ये भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विविध माध्यमातील निसर्गचित्रे, पोर्ट्रेट, अबस्ट्रॅक्ट अशी चित्रे मांडण्यात आली आहेत. रविवार (दि.14) पर्यंत सकाळी साडेअकरा ते संध्याकाळी साडेआठ पर्यंत हे प्रदर्शन रसिकांना पाहण्यासाठी खुले असणार आहे.

सानिका ढाकेफळकर यांनी फर्ग्यूसन कॉलेज येथून बी ए ची पदवी घेतली. त्यानंतर कोलकाता येथे M A केले. सिंबायोसिस पुणे येथून डिप्लोमा इन लिबरल आर्ट्स केले तसेच पुण्यातून डिप्लोमा इन फ्रेंच केले. महाविद्यालयीन जीवनातच त्यांना चित्रकलेची गोडी लागली. पुण्याच्या अभिनव कॉलेजच्या सौ स्मिता मराठे यांनी प्रोत्साहित केल्यामुळे या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केल्याचे सानिका यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.