Pimpri : वंडरलैंड स्कूलमध्ये आषाढी एकादशी साजरी

एमपीसी न्यूज- ओम प्रतिष्ठान संचालित वंडरलैंड स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी दिंडी काढण्यात आली.

या पालखी सोहळ्यामध्ये चिमुकल्या वारकऱ्यांनी श्री विठ्ठल रखुमाई, संत तुकाराम अशी वेशभूषा केली होती. “विठ्ठल विठ्ठल” नामाचा जयघोष करीत ही दिंडी चिंतामणी गणपती मंदिरात पोहोचली. तेथे आरती करून सर्व भाविकांना प्रसाद व तुळशीची रोपे वाटण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन वंडरलैंड स्कूलच्या शिक्षकांनी केले आणि आभार वनिता सावंत यांनी मानले. या कार्यक्रमात पालकांसहित मुलांनीही विशेष उत्साह दाखवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.