Bhosari : ठार मारण्याची धमकी देत लुटणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – जीवे मारण्याची धमकी देऊन मोबाईल फोन आणि पैसे चोरून नेणा-या दोघांना एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली. तरुणाचा मोबाईल फोन आणि रोकड चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आळेश्वर नरेश म्हेत्रे (वय 19, रा. जाधववाडी, चिखली), किशोर बन्सी धनवे (वय 25, रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भूषण सुनील महाजन (वय 20, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास भूषण आणि त्यांचा मित्र टेल्को मटेरियल गेटच्या रस्त्याने जात होते. ते क्रांती चौकाजवळ आले असता आरोपी आळेश्वर आणि किशोर या दोघांनी त्यांना अडवले. दोघांनी भूषण आणि त्यांच्या मित्राला जीवे मारण्याची धमकी दिली. भूषण यांचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 2 हजार रुपयांची रोकड असा एकूण 14 हजार रुपयांचा ऐवज आरोपींनी चोरून नेला.

याबाबत भूषण यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत दोन्ही चोरट्यांनी बेड्या ठोकल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.