Nigdi : तक्रार मागे घेण्यावरून महिलेला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून पायी घरी जात असताना आठ जणांच्या टोळक्याने महिलेला रस्त्यात अडवून ‘तक्रार मागे घे’ असा दम देत मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली. ही घटना रविवारी (दि. 14) पहाटे सव्वा बाराच्या सुमारास आझाद चौक निगडी येथे घडली.

अनिता नवनाथ गायकवाड (वय 52, रा. अंकुश चौक, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाबा क्षीरसागर, राहुल धोत्रे, कौलास विटकर, रुपेश क्षीरसागर, मयूर धोत्रे, शुभम क्षीरसागर, राणी कांबळे, कविता धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता गायकवाड यांनी बाबा क्षीरसागर आणि रेखा कांबळे या दोघांविरोधात यमुनानगर पोलीस चौकीत तक्रार नोंदवली. तक्रार नोंदवून त्या मुलींसोबत रस्त्याने पायी जात होत्या. अनिता निगडी मधील आझाद चौकात आल्या असता आरोपी रिक्षामधून आले. त्यांनी बेकायदा जमाव जमवून अनिता यांना तक्रार मागे घेण्यावरून शिवीगाळ केली. तसेच आणीत आणि त्यांच्या मुलींना देखील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये अनिता जखमी झाल्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.