Talegaon Dabhade : सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षपदी सुनील बबनराव भेगडे यांची निवड

उपाध्यक्षपदी विजय गरुड

एमपीसी न्यूज- कै.पै विश्वनाथराव भेगडे प्रतिष्ठान संचलीत सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या अध्यक्षपदी सुनील बबनराव भेगडे यांची तर उपाध्यक्षपदी विजय गरुड यांची निवड करण्यात आली.

संस्थेच्या सचिव पदावर दत्तात्रय पंढरीनाथ नाटक, खजिनदारपदी राहुल तुकाराम गोळे तर शालेय समितीच्या अध्यक्षपदी रामराव जगदाळे याची निवड करण्यात आली. संस्थेच्या स्थापनेचा उद्देश हा ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळावे असा असून त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे संस्थापक गणेश भेगडे यांनी सांगितले.

तसेच राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळा वाटचाल करत राहील असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील भेगडे यांनी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ संचालक अंकल भेगडे, बी एम भसे, विलास भेगडे, सुनील गायकवाड, खंडूजी टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

राहुल तुकाराम गोळे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.