BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गणपत गोणते

उपाध्यक्षपदी भाजपाचे बाळासाहेब विष्णू ढोरे

एमपीसी न्यूज – मावळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे, चावसर गावचे सरपंच ज्ञानेश्वर गणपत गोणते, तर उपाध्यक्षपदी मळवंडी (ढोरे) येथील माजी सरपंच भाजपाचे बाळासाहेब विष्णू ढोरे यांची बिनविरोध निवड झाली.

या आधीचे अध्यक्ष दत्तात्रय केदारी व उपाध्यक्ष रोहिदास गराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी काल बुधवारी (ता. 17) वडगाव मावळ येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, श्री कोतकर, सचिव किरण लोहर यांनी काम पाहिले. या पदासाठी दोघा जणांचेच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश ढोरे, भाजपाचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, यदूनाथ चोरघे, मधुकर जगताप आदीसह संचालक पंढरीनाथ ढोरे, प्रकाश पवार, दत्तात्रय शिंदे, रवींद्र घारे, बाळासाहेब भानुसघरे, सोपान खांदवे, मारूती खांडभोर, बाळासाहेब पवार, पांडुरंग गराडे, खंडू जाधव, मनीषा आंबेकर, चंद्रभागा तिकोणे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like