Pimpri : लोकलच्या धडकेत रूळ ओलांडणा-या व्यक्तीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – लोकलच्या धडकेत रूळ ओलांडणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास पिंपरी डेअरी फार्म येथे झाला.

मृताची ओळख अद्याप पटली नसून वय अंदाजे 35 वर्षे आहे. चेहरा उभट, नाक सरळ, केस काळे वाढलेले, बांधा सडपातळ, रंग काळा असे वर्णन आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा हिरव्या फुलांच्या रेषा असलेला शर्ट आणि काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव होता. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास पिंपरी लोहमार्ग पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.