Chinchwad : बीव्हीजी कंपनीचे हनुमंतराव गायकवाड यांची कोट्यवधींची फसवणूक

एमपीसी न्यूज – औषधे निर्माण करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका व्यावसायिकाची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2011 ते 2019 या कालावधीत चिंचवड येथे घडली.

विनोद रामचंद्र जाधव, सुवर्णा विनोद जाधव (दोघे रा. विमाननगर पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. या प्रकरणी हनुमंतराव रामदास गायकवाड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणमंतराव गायकवाड आणि त्यांच्या पत्नीने आरोपी यांच्या सावा मेडिको या कंपनीत 12 कोटी 45 लाख 95 हजार 374 रुपयांची गुंतवणूक केली. त्या मोबदल्यात आरोपींनी हनुमंतराव गायकवाड यांना एक कोटी 53 लाख 95 हजार 237 रुपये एवढा सहभाग दिला.

आरोपींनी त्यांच्या सावा मेडिको लिमिटेड, बायोडील लेबोरेटरीज लिमिटेड, अनघा फार्मा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये हनुमंतराव गायकवाड यांना 16 कोटी 45 लाख 4 हजार 366 रुपये गुंतवण्यास सांगितले. त्याबदल्यात आकर्षक परतावा देण्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींनी गायकवाड यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत त्यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.