Pimpri : स्मार्ट सिटीचे कार्यालय ऑटो क्‍लस्टरमध्ये थाटणार; साडेचार लाख रुपये भाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे कामकाज आता चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरच्या दुस-या मजल्यावरुन चालणार आहे. 1032 चौरस फुट जागा असलेले कार्यालय फर्निचरसह तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. प्रतिमहिना चार लाख 40 हजार 635 रुपये भाडे आणि टॅक्स कार्यालयासाठी देण्यात येणार आहे. करारनामा करण्याचे अधिकार स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बहाल करण्यास शुक्रवारी (दि. 19) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

केंद्र सरकाराचा महत्वकांशी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतून नवी मुंबई महापालिका बाहेर पडल्यानंतर तिस-या टप्यात पिंपरी महापालिकेचा त्यामध्ये समावेश झाला. त्याची घोषणा डिसेंबर 2016 मध्ये करण्यात आली. त्यानंतर 13 जुलै 2018 रोजी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली. स्मार्ट सिटीच्या अनेक कामांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. काही कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सिटीचे कामकाज सध्या महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या छोट्याशा कार्यालयातून चालत होते.

स्वतंत्र कार्यालयासाठी जागेचे शोध सुरु होता. संचालक मंडळाने आणि महापालिकेच्या अधिका-यांनी पाच ते सहा इमारतींची पाहणी केली. मात्र, या जागा पसंतीस न उतरल्याने कार्यालय होऊ शकले नव्हते. आता स्मार्ट सिटीचे कार्यालय चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टरच्या दुस-या मजल्यावर थाटले जाणार आहे. 1032 चौरस फुट जागा असलेले कार्यालय फर्निचरसह तीन वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. कॉन्फरन्स हॉल, मीटिंग रूम, मुख्य कार्यकारी अधिका-यांसाठी केबिन, संचालक मंडळासाठी स्वतंत्र दालन आणि कर्मचा-यांना बसण्यासाठी व्यवस्था असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.