BNR-HDR-TOP-Mobile

Chennai : चांद्रयान 2 चे आज दुपारी प्रक्षेपण

एमपीसी न्यूज- आज भारताचे ऐतिहासिक चांद्रयान 2 चंद्राच्या दिशेने झेप घेणार आहे. हेलियमच्या टाकीतील दाब कमी झाल्याने 15 जुलै रोजी उड्डाणाच्या 56 मिनिटे आधी ही मोहीम रद्द करण्यात आली होती. आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या असून आज दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चेन्नईपासून 100 किमीवर असलेल्या सतीश धवन अवकाश केंद्राच्या दुसऱ्या क्रमांकाच्या प्रक्षेपण तळावरून चांद्रयान 2 अवकाशामध्ये झेपावणारे आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रृवाजवळील भागाचा अभ्यास करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे. या उड्डाणाची उलटगणती रविवारी (दि. 21) 6 वाजून 43 मिनिटांनी सुरू करण्यात आली. उड्डाणानंतर मोहिमेचे 15 टप्पे असून त्यात 45 दिवसांच्या काळात हे यान चंद्राच्या कक्षेत जाईल. शेवटच्या 15 मिनिटांत चांद्रयान-2 तेथील दक्षिण ध्रुवावर घिरटय़ा घालत राहील व नंतर रोव्हरसह तेथे अलगद उतरणार आहे.

Advertisement