Bhosari : विद्यार्थ्यांचे आदर्श भविष्य घडवणारी भोसरी येथील एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल

एमपीसी न्यूज- शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवा कोपरा असतो. आपल्याला शाळा घडवते, शाळा वाढवते, जोपासतेसुद्धा. लहानथोर प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी कायम ताज्या असतात. सध्याच्या धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या जगात सर्व सोयींनी सुसज्ज अशी अद्ययावत शाळा आपल्या मुलांसाठी निवडणे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. त्यासाठी प्रत्येकजण धडपड करीत असतो. आपल्या मुलांचे शिक्षण बालवर्गापासून एकाच शाळेत व्हावे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. त्यानुसार शाळेची निवड करण्यात येते. यातही एसएससी बोर्ड, सीबीएससी, इंटरनॅशनल बोर्ड यातून एका प्रकाराची निवड करावी लागते.

पुणे हे पहिल्यापासूनच शिक्षणाचे माहेरघर असे मानले जाते. पुण्याचे शेजारी शहर म्हणून पिंपरी चिंचवड नावारुपाला येऊ लागले. पुण्याच्या धर्तीवर या परिसरात देखील पुण्यातील अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांच्या शाखा येथे सुरु झाल्या. तसेच पिंपरी चिंचवड परिसरातदेखील शिक्षणाच्या अनेक उत्तम सुसंधी असल्याने येथे देखील इतर अनेक नामांकित शाळा स्थापन झाल्या. सुरुवातीच्या काळात थोड्याच शैक्षणिक संस्था होत्या. पण जसजशी लोकसंख्या वाढत गेली. परिसराचा विकास होऊ लागला तसतशा अनेक संस्थांच्या शाखा येथे सुरु झाल्या. सध्याच्या घडीला पिंपरी चिंचवडमध्ये अनेक संस्थांमधून हजारो विद्यार्थी आधुनिक शिक्षण घेत आहेत.

भोसरी येथील एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल ही सन २०१० साली स्थापन झालेली शाळा या परिसरातील एक नामांकित शैक्षणिक संस्था आहे. सीबीएसई पद्धतीचे शिक्षण देण्या-या या शैक्षणिक संस्थेचे श्री. पांडुरंग नाना गवळी हे अध्यक्ष असून सौ. सुनीता माई गवळी या उपाध्यक्ष आहेत. तसेच श्री. नितीन मधुकर लोणारी हे सचिव आहेत. शाळा स्थापनेवेळी विद्यार्थ्यांची संख्या ६७ होती. सध्या ३००० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. संस्थेची मुख्य शाखा भोसरी येथे असून मोशी, चिखली, भोसे येथे इतर शाखा आहेत. भोसरी शाखेत नर्सरी पासून १२ वी पर्यन्त वर्ग असून अकरावी व बारावी शास्त्र व कॉमर्सचे वर्ग येथे घेतले जातात. गेल्या वर्षीचा १० वी चा निकाल ९९% लागला आहे. शाळेसाठी खुले मैदान ही मुख्य सुविधा या शाळेत आहे. शहरातील मैदाने कमी होत चालली असताना येथील विद्यार्थी मात्र या मैदानावर आपले कसब दाखवण्यात यशस्वी होत आहेत. कबड्डी ,खो खो ,ताईक्वोंदो ,आर्चरी, फुटबाँल, बुद्धिबळ व इतर खेळांमध्ये या शाळेतील विद्यार्थी पारंगत असून विविध स्पर्धांमध्ये ते नेहमी बाजी मारुन शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यात यशस्वी होतात. तसेच शाळेत सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक कार्यक्रम ,सामाजिक कार्यक्रम ,सण समारंभ नेहमीच झोकात साजरे होतात. त्यात विद्यार्थ्यांचा सक्रीय सहभाग असतो. शाळेमार्फत टॅबलेट ऑलिम्पियाड ,IMO,चित्रकला यासारख्या इतर अनेक स्पर्धा घेतल्या जातात. त्यातदेखील विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग असतो. याशिवाय शाळेत सुसज्ज संगणक लॅब, गणित लॅब, वाचनालय, सायन्स लॅब यासारख्या आधुनिक सुविधा देखील आहेत.

मोशी, आळंदी ,लांडेवाडी, चऱ्होली येथून विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत नेण्या आणण्याची सोयदेखील करण्यात आली आहे. आम्ही भविष्य घडवतो हे ब्रीदवाक्य असलेल्या एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये अनुभवी प्रशिक्षित शिक्षक वर्ग असल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित हातात आहे याचा शाळेला नेहमी अभिमान आहे.

एस पी जी इंटरनॅशनल पब्लिक स्कूल
पत्ता :-स नं -२०३,दुर्वांकुर मंगल कार्यालयाजवल ,आळंदी रोड,भोसरी ,पुणे-३९

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like