Pune : अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चरतर्फे चांबळी येथे फळझाडांची लागवड

एमपीसी न्यूज- ‘वन महोत्सव 2019 ‘ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर तर्फे चांबळी (ता . पुरंदर ) येथे फळझाडांची लागवड करण्यात आली.

आंबा, पेरू, जांभूळ अशी स्थानिक भारतीय प्रजातींची झाडे लावण्यात आली. प्राचार्य लीना देबनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा . जोहेर सियामवाला,प्रा. शिल्पा ढवळे, प्रा. अतुल कटारिया तसेच विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.