Pimpri : भूगोल फाउंडेशनतर्फे पाचाणे व पुसाणे येथे वृक्षारोपण ; दीड हजार झाडे लावली

एमपीसी न्यूज- भूगोल फाउंडेशन, महाराष्ट्र शासन वनविभाग मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने व गया फाउंडेशन सहकार्याने तसेच पिंपरी येथील डी.वाय.पाटील आयुर्वेदिक कॉलेजचे विद्यार्थी ‌यांनी मावळ तालुक्यातील कासारसाई जवळील पाचाणे व पुसाणे या दोन्ही गावातील डोंगर परिसरात दीड हजार झाडे लावली. 

या मोहिमेमध्ये संतनगर मित्र मंडळ, डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज, गया फाउंडेशन पिंपरी चिंचवड, सखी मंच यांनी सहभाग घेतला. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.झेड.ताकवले, भुगोल फाऊंडेशनचे अध्यक्ष.विठ्ठल वाळुंज यांनी झाडे कशा पद्धतीने लावायची याचे प्रात्यक्षिक दाखविले.

यावेळी मावळ वनविभागाचे वनपाल.एस् एस् सपकाळे, डी एम् ठेंबरे, ए. ए. भालेकर, वनरक्षक श्रीमती आर एस् वाघमारे, वाय.झेड लंकेश्वर, श्रीमती एम एन शिरसाठ, श्रीमती एस जी मेरगळ, श्रीमती ए टी शेळके, गया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय राठोड, डी.वाय.पाटील आयुर्वेदिक कॉलेजचे प्राध्यापक डॅा.डी.जे.दिपंकार, मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, श्री शंकरशेठ तांबे, सखी महिला मंचच्या नंदा फुगे, डॅा.पुजा देशमुख, डाॅ.प्राची पुरोहित, डाॅ.दिप्ती लट्टा उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये निकुंज रेंगे, सुनील काटकर, गणेश चौधरी , बाळासाहेब गरूड, मुकुंद साळुंखे, झारखंडे राय, समीर कालेकर, राहुल जाधव, नवनाथ बाळसराफ, सुनीता बिराजदार, सोनाली होनाळी, सचिन घेनंद, विजय सुतार, मनोज माकोडे, मनोज साबळे, ज्योती विलास, आर सोनवणे,अतुल नढे, डाॅ. अभिषेक वाळुंज, प्रमोद घुले, तेजस बडगुजर, श्रावणी ढोकले, शलाका संभुस, ऋतुजा खुसपे, श्रेया गांधी, वृषाली म्हस्के, आदिती शहा, मंगेश शिंदे, तुषार देवकाते, मोहित भोसले, आशिष जाधव, श्रीनाथ टेकाळे, राहुल खुशवा, संतनगर मित्र मंडळाचे साहेबराव गावडे, शशिकांत वाडते, राजेश डहाके, महेश सगर, भारती डहाके, ज्योती दरंदळे, श्वेता सगर, भागवत पाटील, आदेश गरुड, राजश्री शहा, निलमआढाव ,शैला कांबळे, अश्विनी जाधव असे अनेक सहकारी व लहान मुले सहभागी झाले होते.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.