Maval: पवना धरणात 85 टक्के पाणीसाठा; आज पाणीकपात रद्द होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडसह मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. पवना धरणात 84.87 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पाणीसाठ्याचा आज (गुरुवारी) आढावा घेण्यात येणार असून पाणी कपात रद्द केली जाण्याची शक्यता आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर दहा दिवस पावसाने दडी मारली होती. गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून धरणातील पाणीसाठा 84.87 टक्के झाला आहे. त्यामुळे पुढील वर्ष भराचे पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

आजमितीला धरणात 84.87 टक्के पाणीसाठा

गेल्या 24 तासात झालेला पाऊस 63 मि.मि

1 जूनपासून झालेला पाऊस 1939 मि.मि

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2128 मि.मि

धरणातील आजचा पाणीसाठा 84.87 टक्के (7.22 टीएमसी)

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 97.17 टक्के (8.27 टीएमसी)

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ 3.64 टक्के*

1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ 70.41 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.