Pune : खडकवासला धरण साखळीत सरासरी 84 टक्के पाणीसाठा

एमपीसीन्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरण परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली असून या धरण साखळीमध्ये सरासरी 84 टक्के पाणीसाठा झाला आहे.

आज, गुरुवारी सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार, खडकवासला धरण परिसरामध्ये मागील 24 तासात 9 मिमी पाऊस पडला असून आजपर्यंत ६९६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 1.97 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 100 टक्के भरले आहे.

पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील 24 तासात 130 मिमी पाऊस झाला असून पाणी पातळीमध्ये 10 टीएमसीने वाढ झाली आहे. यंदाच्या मोसमात आजपर्यंत 1873 मिमी इतका पाऊस पानशेत धरण परिसरामध्ये झाला असून धरण 93.95 टक्के भरले आहे.

वरसगाव धरणामध्ये मागील 24 तासात 115 मिमी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमामध्ये आजपर्यंत १८४५ मिमी पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 9.94 टीएमसी इतकी वाढ झाली असून धरण 77. 55 टक्के भरले आहे.

टेमघर धरण पाणलोटक्षेत्रामध्ये मागील 24 तासामध्ये 79 टक्के पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात आजपर्यंत एकूण 2632 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणी पातळीमध्ये 2.97 टक्के इतकी वाढ झाली असून धरण 69.32 टक्के भरले आहे.

चारही धरणात सरासरी 84 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून 24.49 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. मागील वर्षी याच दिवशी चारही धरणे सरासरी 86.54  टक्के भरली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.