स्मार्ट पिंपरी-चिंचवडसाठी 108 लोगो स्पर्धेत

एमपीसी न्यूज – स्मार्ट पिंपरी-चिंचवडसाठी नागरिकांनीच लोगो तयार करावा यासाठी केंद्र सरकारतर्फे बोधचिन्ह (लोगो) स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी कालअखेर (दि.15) 108 लोगो स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. या 108 लोगोंमधून जो लोगो प्रथम क्रमांक पटकवणार आह. तो स्मार्ट पिंपरी-चिंचवडचा अधिकृत लोगो ठरणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला आहे. यासाठी केंद्र सरकार व माहापालिका प्रशासन यांच्या वतीने स्मार्ट पिंपरी-चिंचवडचा कार्यवाही अहवाल बनविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्मार्ट पिंपरी-चिंचवड लोगो ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी आपले लोगो देण्यासाठी काल शेवटची तारीख होती. त्यानुसार काल अखेर 108 लोगो स्पर्धेमध्ये दाखल झाले आहेत. 



मिळालेल्या लोगोची परिक्षकांकडून पाहणी केली जाणार असून, त्यातून तीन लोगो निवडले जातील.त्यातील प्रथम क्रमांकाला 25 हजाराचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाला 15 हजाराचे बक्षीस तर तिस-या क्रमांकासाठी 10 हजाराचे बक्षीस मिळणार आहे.  त्यातील प्रथम क्रमांकाचा लोगो हा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा लोगो मानला जाणार आहे. या लोगोचे परीक्षण लोगोच्या डिझाईनमध्ये वापरलेले नाविन्यपूर्ण कल्पना व त्यांचा वस्तुस्थितीशी लावलेला संबंध यावरुन मूल्यांकन केले जाणार आहे.  

या स्पर्धेचा निकालाची तारीख अद्याप जाहीर केली नसली, तरी येत्या दोन दिवसात त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

"dipex"

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.