Pimpri: सर्वाधिक रुग्ण वाढ, दिवसभरात 108 जणांना कोरोनाची लागण; 95 जणांना डिस्चार्ज, तिघांचा मृत्यू

108 persons tested positive for coronavirus in Pimpri Chinchwad today. दापोडी, दिघी, धुळ्यातील पुरुषाचा YCMH मध्ये मृत्यू, रुग्णसंख्या पोहोचली 1474 वर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील तब्बल 101 आणि महापालिका हद्दीबाहेरील 7 अशा 108 जणांना आज (गुरुवारी) कोरोनाची लागण झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वाधिक वाढ आहे. महापालिका रुग्णालयातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 95 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दापोडी 65 वर्षीय, दिघी 43 वर्ष आणि धुळ्यातील 66 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 1474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

पालिकेने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शहरातील पिंपरी, हिंदचौक पिंपळे निलख, शिवतीर्थ काळेवाडी,मोरेवस्ती चिखली,मोरवाडी, खंडोबामाळ, तानाजीनगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, पिंपळे सौदागर, विद्यानगर चिंचवड, नवी सांगवी, पंचतारानगर आकुर्डी, भाटनगर, इंदिरानगर चिंचवड, आंबेडकरनगर पिंपरी, दत्तनगर चिंचवड, घरकुल चिखली, गांधीनगर पिंपरी, दापोडी, तुळजाभवानी कॉलनी थेरगाव, शिवशक्ती चौक भोसरी, वैभवनगर पिंपरी, नाशिक फाटा कासारवाडी, सोनगिरा विहार काळेवाडी, बौध्दनगर पिंपरी, जगताप डेअरी, बिजलीनगर चिंचवड, उद्यमनगर पिंपरी, तापकीर चौक काळेवाडी, सिध्दार्थ नगर दापोडी,विनायकनगर पिंपळेगुरव, यमुनानगर, कोकणेनगर,गवळीमाथा भोसरी, संभाजीनगर चिंचवड, मिलिंदनगर पिंपरी, गणेशनगर थेरगांव,मोरेवस्ती चिखली परिसरातील 101 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

याशिवाय महापालिका हद्दीबाहेरील कोंढवा,येरवडा, कान्हे,बोपोडी, हिंजवडी,सिंहगड रोड व देहूरोड येथील सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

तर, नढेनगर काळेवाडी, रमाबाईनगर पिंपरी, बौध्दनगर पिंपरी, केशवनगर चिंचवड, शाहुनगर, चिंचवड स्टेशन, साईबाबा नगर चिंचवड, अजंठानगर आकुर्डी, सिध्दार्थ नगर दापोडी, विजयनगर काळेवाडी, आनंदनगर, माऊली चौक वाकड, दत्तनगर दिघी, शिवतिर्थ नगर काळेवाडी, चिखली, दिघीरोड भोसरी, वाल्हेकरवाडी, भीमनगर पिंपरी, साईबाबा नगर चिंचवड, सुदर्शन नगर, पिंपळे गुरुव, गुलाबनगर दापोडी, गांधीनगर खराळवाडी, धनगर बाबा मंदीर रहाटणी,पिंपरी, दत्त मंदिर वाकड, नाणेकर चाळ पिंपरी, पिंपळे सौदागर, काटेनगर दापोडी, बेलठीका नगर थेरगाव, एम.बी.कॅम्प किवळे, चाकण,खडकी, ठाणे, सिंडगडरोड येथील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 95 जणांना आज घरी सोडण्यात आले आहे.

शहरात आजपर्यंत 1474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 924 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 26 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 21 अशा 47 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 533 सक्रीय रूग्णांवर महापालिका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजचा वैद्यकीय अहवाल!
#दाखल झालेले संशयित रुग्ण – 764
# पॉझिटीव्ह रुग्ण – 108
#निगेटीव्ह रुग्ण – 718
#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 454
#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 1038
#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 737
#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 1474
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 533
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 47
#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 924
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 20087
#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 62044

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.