Mulshi : मुळशी धरण 93 % भरले ! कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग

एमपीसी न्यूज- मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळशी धरण 93% भरले असून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग चालू करण्यात येईल असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

त्यामुळे धरणाच्या खालील भागातील मुळा नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रामध्ये प्रवेश करू नये. विजेच्या मोटारी, इंजिने शेती अवजारे, पशुधन यांची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जिवीत वा वित्त हानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पूढील पर्जन्यमानानुसार विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो असेही जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.

धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यास त्या पुराचा फटका सांगवी भागातील मुळा नदीकाठच्या नागरिकांना बसू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.