Pune : पत्नीच्या आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने केला पत्नीचा खून

आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी लिहून पती बेपत्ता

एमपीसी न्यूज- बायकोच्या आजारपणाला कंटाळून एका 77 वर्षाच्या नागरिकाने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर आपण आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी लिहून तो गायब झाला. ही घटना आज सकाळी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॉवर व्हॅली लोटस सोसायटी मध्ये फ्लॅट नंबर 102 मध्ये उघडकीस आली.

देविंदर कौर बिंद्रा (वय 60) असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून हरविंदर सिंग बिंद्रा (वय 7८) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे.

याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॉवर व्हॅली लोटस सोसायटीमध्ये हरविंदर सिंग बिंद्रा यांनी आपल्या आजारी पत्नी खून देविंदर कौर बिंद्रा हिचा खून केला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता देविंदर कौर बिंद्रा ह्या जखमी अवस्थेत आढळून आल्या.

पोलिसांनी बिंद्रा यांचा मुलगा रमेंद्रसिंग यांच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या वडिलांनीच आपल्या आईचा चाकूने गळा चिरून खून केला असून आणि त्यानंतर देविंदर कौर ही आजारी असल्याने मी तिला सांभाळू शकत नसून तिला मी स्वतः मारलेले आहे. यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये तसेच त्यानंतर मी सुद्धा आत्महत्या करणार असल्याची चिठ्ठी लिहून हरविंदर सिंग बिंद्रा गायब झाल्याचे सांगितले.

पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.