Maval : पवना धरणातून पाण्याच्या विसर्गात घट ; 8510 वरून 2636 क्यूसेक

पवना धरणातून 8,510 क्यूसेक तर मुळशी धरणातून 24,750 क्यूसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरणांमधील पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये घट करण्यात आलीआहे. आज पहाटे 8 हजार 510 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. मात्र आता यामध्ये आज, मंगळवारी दुपारी 12 वाजल्यापासून घट करण्यात येऊन 2 हजार 636 इतका करण्यात आलेला आहे.

पवना धरणातील पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पवना धरणातून 20 हजार 500 क्यूसेक पाणी सोडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र आता धरण परिसरात पावसाचा जोर सोमवारी सायंकाळनंतर कमी झाला. त्यामुळे धरणातून 12 हजार 446 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

या विसर्गामध्ये आणखी कपात करून आज सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 8 हजार 510 क्यूसेक करण्यात आला. मुळशी घरणातून देखील आज, मंगळवारी पहाटे दोन वाजता विसर्ग 32 हजार 500 क्युसेक वरून 24 हजार 750 क्युसेक केला आहे. यामुळे लवकरच पुराचे पाणी ओसरेल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, खडकवासला धरणातून सुरू असलेला 45 हजार 474 क्यूसेक विसर्ग कमी करुन 39 हजार 611 क्यूसेक इतका करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.