Maval : पवना धरणातून 9 हजार तर मुळशी मधून 20 हजार क्युसेक विसर्ग

एमपीसी न्यूज- पवना धरण 94.44 टक्के भरले असून आज सकाळी 6 वाजल्यापासून पवना धरणामधून 9 हजार 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांनी सावधानता बाळगावी अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान मुळशी धरणामधून देखील आज सकाळी 6 वाजल्यापासून 20 हजार  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पवना धरणातून होत असलेल्या विसर्गामध्ये 15 हजार क्युसेक इतकी वाढ करण्यात येईल असे जलसंपदा विभागाने कळवले आहे. 

पवना धरणाची आकडेवारी

# गेल्या 24 तासात झालेला पाऊस 101 मि.मि.
# 1 जूनपासून झालेला पाऊस 2849 मि.मि.
# गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस 2236 मि.मि.
# धरणातील आजचा पाणीसाठा 94.44 टक्के (8.04 टीएमसी)
# गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा 98.86 टक्के (8.42 टीएमसी)
# गेल्यावर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेपर्यंत झालेला जादा पाऊस 613 मिमी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.