BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टिमुळे तालुक्यामध्ये मोठया प्रमाणावर शेतीचे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर अनेक घरांची पडझड झाली असून नागरिक, जनावरे देखील मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे सर्वांना शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात मावळच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवक तालुकाध्यक्ष कैलास गायकवाड, अंदर मावळ युवक अध्यक्ष कैलास खांडभोर, नाणे मावळ युवक अध्यक्ष चंद्रशेखर परचंड, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल जाधव, जिल्हा परिषद गट अध्यक्ष दिगंबर अगिवले, बबन ओव्हाळ, शरद गायकवाड, बारकु पवार आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3