Pimpri : शिवसेना व्यापारी सेलच्या पिंपरी अध्यक्षपदी किशोर केसवानी यांची निवड

एमपीसी न्यूज- शिवसेना व्यापारी सेल पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी पिंपरी येथील व्यापारी किशोर केसवानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. केसवानी हे सिंधी समाजाचे असून पिंपरीमध्ये गेली 30 वर्षापासून उद्योग व्यवसायात सक्रीय आहेत. त्यांच्या निवडीबद्दल शिवसेना आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी त्यांचे आज अभिनंदन केले. यावेळी महिला संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, पिंपरी विभागप्रमुख अनिल पारचा, पिंपरी विधानसभा समन्वयक माधव मुळे आणि जितू मंगतानी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.