BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अभिनेता बोमन इराणी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

(रिता मदनलाल शेटीया)

एमपीसी न्यूज- एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्या वयाच्या 44 व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात टर्निग पॉईंट आला, ज्याने त्यांचे जीवन बदलून टाकले, वेटर, दुकानदार , फोटोग्राफर आणि एक उत्तम अभिनेता असा त्यांचा जीवन प्रवास … यश , नेम , फेम मिळाले ते 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या मुन्ना भाई एम.बी. बी. एस. या चित्रपटातील त्यांच्या उत्तम भूमिका आणि अभिनयामुळे, ते म्हणजे बोमन इराणी.

नुकत्याच एका कार्यक्रमात बोमन इराणी यांना ऐकण्याची संधी मिळाली. विषय होता, “ऍण्ड द जर्नी बिगेन्स ….. तो आला, त्याने पहिले … आणि बरेच काही महत्वपूर्ण सांगितले, जे आजच्या तरुणाई बरोबर प्रत्येकालाच खूप काही तरी शिकवून जाते. कोणताही कार्यक्रम असो, मी नेहमी वेळेच्या आत हजार असतो, याला कारण ही तसेच आहे याचा किस्सा सांगताना भावुक झालेल्या इराणी नि सांगितले कि , माझा जन्म २ डिसेंबर १९५९ साली झाला, आणि माझे वडिलांचे निधन मे १९५९ मध्ये झाले. माझा जन्म जरा उशिराच झाला कारण वडिलांना पाहताही आले नाही आणि जन्म घेण्याआधी वडिलांचे छत्र ही गेले . त्यामुळे कुठेही जायचे असो वेळेच्या आतच मी पोहचतो. यातून वेळेचे महत्व त्यांनी पटवून दिले. असेच छोटे छोटे किस्से सांगत त्यांनी महत्वाच्या पैलूंवर सगळ्यांचेच लक्ष वेधले.

1. Never Give up – हाती घेतलेले कोणतेही कार्य असो, कितीही अडचणी आल्या तरी, ते कार्य सोडून देऊ नका , अंतिमतः मिळणारे समाधान तुम्हास आनंद देऊन जाते. या वरील किस्सा सांगताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील काही घटना सांगितल्या. आयुष्यातील पहिले काम म्हणजे वेटरचे जेव्हा सुरु करायचे ठरवले तेव्हा ते त्यांच्या आजींना जाऊन भेटले, (आयुष्यात जर कुणाचा सल्ला तुम्हाला हवा असेल तर आजी – आजोबांचा घ्या , तेच तुम्हाला योग्य मार्ग आणि सल्ला देतील.) आजीला सांगितलं कि मी वेटरची नौकरी करू इच्छितो, करू का ? तेव्हा आजी म्हणाली आयुष्यात जे करशील ते चांगले (बेस्ट) कर .

2.Start with the base – बस.. आजीच्या या शब्दांना मी कायमचे लक्षात ठेवले आणि जीवनात बेस्ट करायचे या विचाराने मी ताज हॉटेल मध्ये वेटरच्या मुलाखतीसाठी गेलो, तेथे असलेल्या पारशी व्यवस्थापकाने विचारले, कामाला सुरुवात कुठून करणार, मी म्हणालो टॉप पासून, तेव्हा ते म्हणाले , बेसमेंट पासून सुरवात कर, तरच टॉप पर्यंत पोहचशील. त्यांचे हे वाक्य मनात घर करून गेले, कधी ही पहिल्या पायरी पासून सुरवात करा, तरच तुम्ही (टॉप पर्यंत ) उंची गाठू शकता . (Start with the base, and then you will reach the top)

3. Never forgot where you come from – तुम्ही कोठून आला आहात ते कधीही विसरू नका. या वरील किस्सा ही त्यांनी सांगितला कि, मी जेव्हा विविध शो साठी जातो तेव्हा मला विचारले जाते कि सर प्रवास कसा झाला? व्यवस्थेत काही कमी तर नाही ना? 5 स्टार हॉटेल असतानाही अशी विचारणा जेव्हा मला केली जाते तेव्हा मी ज्या परिस्थितीतून आलोय त्याला विसरत नाही माझ्या वडिलांचा जन्म भर पाऊस चालू असताना तंबू मध्ये झाला, या स्थितीतही माझ्या आजी ने मुंबई ला जाण्यासाठी बोटीने प्रवास केला. त्यांनी ज्या स्थितीचा सामना केला आहे, तशी परिस्थिती आपल्या समोर नाही पण अश्या कुटुंबाचा मी सदस्य असताना, मी कोठुन आलोय कसा विसरू.

4. Come out on your comfort zone – तुमच्या कंफोर्ट झोन मधून बाहेर पडा. जसे कि, वडिलांचा व्यवसाय आहे तर तोच व्यवसाय न करता, तुम्हाला ज्यात आवड आहे ते करा . स्वतः काहीतरी वेगळे करा . धोके, समस्यांचा संघर्ष करावा लागेल पण अंतिमतः मिळणारे समाधान लाख मोलाचे असते . जे मी केले , वेटरच्या कामनंतर मी चिप्स चे शॉप टाकले , काही वर्ष सर्व शेट- शेट म्हणायचे तर खूप चांगले वाटायचे, पण नंतर कळत गेले कि , आपल्याला हे नाही काही तरी वेगळे करायचे आहे. आणि मग मी मला आवड असलेल्या फोटोग्राफीचा व्यवसाय सुरु केला.

5. Never blame the situation – परिस्थितीला कधी हि दोष देऊ नका. आलेली परिस्थिती तुमच्यासाठी काही तरी अजून चांगले घेऊन येत असते. जेव्हा मला आंतरराष्ट्रीय स्थरावरील फोटो शूट करण्याचे काम मिळाले, ३ फोटो काढायचे होते आणि 900 डॉलर मिळणार होते. दोन डान्सरच्या मधील जुगल बंदी चे फोटो घ्यायचे होते, पण तसे काही घडत नव्हते , एक वेळ मनात आले कि , आपण काढलेले फोटो यांना आवडले नाही तर, वेळ हि जाईल आणि पैसेही , पण दुसर्याक्षणी मी विचार केला, पैसा महत्वाचा नाही तर एखाद्याला दिलेले वचन, कामाची कमिटमेंट महत्वाची आणि मी 3 फोटो घेतले, ते त्यांना आवडले आणि मला 900 डॉलर मिळाले, शिवाय ते फोटो जेव्हा जेव्हा उपयोगात आणले गेले, त्याचे पैसे मला मिळत गेले. आलेल्या प्रत्येक परिस्थितीला/ समस्येला एक आव्हान म्हणून स्वीकारा , यश नक्की मिळेल.

किसीने ठीक हि कहा है ! सपने वो नही जो निंद मै आते है , सपने वो है, जो निंद ना आणे दे! खुद्द पै भरोसा रखो, तो हि दुसरे आप पै भरोसा कर सकेंगे! आयुष्यात तुम्ही पडाल, पण पुन्हा नव्या उमेदीने उभे रहाल, हेच तर जीवन आहे . स्वतःसाठी प्रत्येक जण जगत असतो , कधीतरी दुसर्या साठी जगून पहा, मिळणारा आनंद हा निराळाच असतो . एका सामान्य व्यक्ती महत्वाची हि असामान्य कहाणी आणि जीवन प्रवास जो आपल्याला खूप काही शिकवून जातो.

Advertisement