Pune : अंधशाळेत स्वातंत्र्यदिन आणि अनोखे रक्षाबंधन साजरे

८० विद्यार्थिनींना झेंडे, फुगे, खाऊ आणि शालेय सँडलचे वाटप

एमपीसी न्यूज- ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ (कोथरूड) मध्ये स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन साजरे झाले. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ आणि ‘हेलपींग हँड’ च्या वतीने ‘झेंडे, फुगे, चॉकलेट, नाश्ता वाटप करण्यात आले, अशी माहिती ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि ‘हेलपींग हँड’ चे उमेश गिरासे यांनी पत्रकाद्वारे दिली.

ध्वजारोहणानंतर ‘पूना स्कुल फॉर ब्लाइंड गर्ल्स’ च्या विद्यार्थिनींनी राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. ‘अखिल वनाज कॉर्नर दहीहंडी उत्सव समिती ट्रस्ट’ चे अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि हेलपींग हँड चे सदस्य यांनी विद्यार्थिनींना शालेय सँडलचे वाटप केले.

“समाजात जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक उपक्रमातून मदत करणे हा हेतू या उपक्रमाचा होता” असे ट्रस्ट चे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी सांगितले.  यावेळी विनायक वरपे, राहुल खंदारे, अमोल गायकवाड, अमोल सातकर, संदेश कोटकर, दुशंत मोहोळ, शिक्षकवर्ग आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. शाळेच्या शिक्षकवर्गाने या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमाच्या माध्यमातून वेगळाच आनंद आणि समाधान मिळाले. झेंडा, फुगे, खाऊ आणि सँडल मिळाल्यानंतर अंध विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा होता, असे देखील गिरीश गुरनानी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.