Yavatmal : दहावीचा मराठी पेपर अवघ्या 10 मिनिटातच व्हायरल; यवतमाळ पाटणबोरी येथील प्रकार

एमपीसी न्यूज – दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली (Yavatmal) असून पहिल्याच दिवशी मराठी विषयाचा पेपर परीक्षा सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटातच व्हाट्सप ग्रुपवर व्हायरल झाला. पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे ही घटना घडली. यामुळे परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांत एकच खळबळ उडाली.

माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयता 10 वीच्या परीक्षेला शुक्रवारी (दि. 1) सुरुवात झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात एकूण 158 केंद्रावर 38 हजार 565 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात परीक्षेची भीती राहू नये म्हणून पहिलाच पेपर मराठीचा ठेवण्यात आला. दरम्यान आज सर्वत्र परीक्षा सुरळीत सुरू असताना पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे मात्र अवघ्या 10 मिनिटात मराठीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या.

पांढरकवडा शहरातील 75 कोटी सूर्यनमस्कार असा प्रतिष्ठित नागरिकांचा व्हाट्सअप ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये पाटनबोरी येथून अनोळखी क्रमांकावरून प्रश्नपत्रिकेचे फोटो 11 वाजून 10 मिनीटांनी परीक्षा केंद्राच्या बाहेर आले आहे. विशेष म्हणजे एन 501 सेटच्या या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण 15 ते 16 पाने या ग्रुपवर आली. पेपर कोणत्या सेंटरवरून व्हायरल करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. मात्र या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे परीक्षा केंद्राला पोलीस संरक्षण आहे. तसेच परीक्षा (Yavatmal) केंद्रात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कडक नियम आहेत. मग पेपर अवघ्या दहा मिनिटात बाहेर कसा आला हे एक मोठे कोडे आहे.

Pune : महासंस्कृती महोत्सवात काव्यवाचन आणि एकांकिकांना रसिकांची दाद

याबाबत माध्यमिकचे शिक्षणाधिकारी जयश्री राऊत यांना विचारले असता त्यांनी पेपर वेळेच्या अगोदर बाहेर येणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगितले आहे. शिवाय या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

पेपर व्हायरल झाल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर परीक्षा केंद्रात मोबाईल कसा जात आहे. तो विद्यार्थी घेऊन जातो की कर्तव्यावर असलेला कर्मचारी अथवा शिक्षक, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करूनही मोबाईल आत गेला ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.