10 th Result : परिक्षेचे गुण पुन्हा पडताळायचे आहेत…मग जाणून घ्या रिचेकिंगची प्रोसेस

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र उच्च माध्यमिक व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या मार्च 2023 परिक्षेचा निकाल (10 th Result) लागला आहे. यात कोणाला अपेक्षे एवढे गुण मिळाले असतील किंवा काहींची निराशा झाली असेल. आपले गुण हे कमी आले आहेत आपण त्यापेक्षा जास्त मेहनत घेतली होती अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात येते, यावेळी विद्यार्थ्यांना गुण पडताळणी म्हणजेच रिचेंकीगचा पर्याय दिला जातो. त्यासाठी काय करावे लागेल याची महिती थोडक्यात पुढील प्रमाणे-

इच्छुक विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत मागण्यासाठी  किंवा पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. तो अर्ज http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

Moshi : मोशीमधील गंधर्व नगरीत दररोज आठ तास वीज गायब

गुणपडताळणीसाठीचे अर्ज उद्या पासून म्हणजे शनिवार (दि.3)  ते सोमवार (दि.12) पर्यंत व छायाप्रतीसाठी शनिवार (दि.3)  ते दि. 22 जून पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card / Credit Card / UPI / Net Banking) याद्वारे भरता येईल.

मार्च 2023 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळालेल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहान मंडळाने (10 th Result) केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.