India Corona Update : देशात 11.21 लाख सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 94.92 टक्क्यांवर 

एमपीसी न्यूज – भारतात मागील चार दिवसांपासून एक लाखाहून कमी कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 91 हजार 702 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. बरे होणा-या रुग्णांची संख्या अधिक असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या देशात देशात 11.21 लाख सक्रिय रुग्ण असून देशाचा रिकव्हरी रेट 94.92 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 92 लाख 74 हजार 823 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 77 लाख 90 हजार 073 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या 24 देशात तासांत 1 लाख 34 हजार 580 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात सध्याच्या घडीला 11 लाख 21 हजार 671 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 63 हजार 079 वर पोहोचली आहे. मागील 24 तासांत देशभरात 3 हजार 403 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा मृत्यूदर 1.24 टक्के एवढा झाला आहे.

देशात आजवर 37 कोटी 42 लाख 42 हजार 384 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 20 लाख 44 हजार 131 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 24 कोटी 60 लाख 85 हजार 649 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.