महिला दिनानिमित्त युवा सांस्कृतिक मंचातर्फे 11 आदर्श महिलांचा सत्कार

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथील युवा सांस्कृतिक मंचाच्या वतीने सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणा-या शहरातील 11 आदर्श महिलांचा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तळेगाव दाभाडे, यशवंतनगर येथील फ्रेंडस् ऑफ नेचर सभागृहात रविवारी (दि.5) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी योग प्रशिक्षक अशोक बकरे, संगीत व गानप्रेमी पंडित विनोदभूषण आल्पे, माजी उपनगराध्यक्ष खंडागळे मामा, गोशाळेचे संचालक संदीप संघवी, कम्युनिटी एड प्रोग्रामच्या प्रवर्तक नयना आभाळे आदी उपस्थित होते.

जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय, सामाजिक बांधिलकी ठेवून कार्य करणा-या जयश्री चेपे, अनिता धारके, ज्योती नागपूरकर, ललिता ढमढेरे, रुचा वळवडे, साधना महाजन, सुचेता फातरफोड, सुमित्रा दौंडकर, उर्मिला बासरकर, कविता जैन, अनघा बुरसे यांचा नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.