Maval : मावळ विधानसभेकरिता 11 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 11 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सुभाष बागडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

मावळ विधानसभेच्या निवडणुकीसाठी एकुण सतरा जणांनी उमेदवारीसाठी अर्ज नेले होते. यामध्ये भाजपच्या वतीने राज्यमंत्री बाळा विश्वनाथ भेगडे व माजी सभापती गुलाबराव गोविंद म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुनील शंकरराव शेळके व त्यांची पत्नी सारिका सुनील शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर वंचित बहुजन आघाडीकडून रमेश आनंदा ओव्हाळ व बहुजन समाज पार्टीकडून मंदाकिनी शशिकांत भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

याव्यतिरिक्त रवींद्र आण्णासाहेब भेगडे यांच्यासह धर्मराज यशवंतराव तंतरपाळे, खंडू बाळाजी तिकोणे, मुकेश मनोहर आगरवाल, दीपक यशवंत लोहर यांनी अपक्ष अर्ज दाखल केले. उद्या शनिवार (दि. 5) सकाळी 11 वाजता या अर्जाची छानणी होणार असून सोमवार दि. 7 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.