Pune : धक्कादायक ! मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरीच्या मालकासह 11 कर्मचारी कोरोना बाधित

11 employees including the owner of the famous dairy at Magarpatta found corona positive

एमपीसी न्यूज- मगरपट्टा येथील प्रसिद्ध डेअरी मालकासह 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामुळे मगरपट्टा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मागील चार दिवसांपूर्वी डेअरीच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने तपासणी करण्यात आली होती. संबंधित कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले. डेअरीच्या मालकासह 11 जणांची तपासणी केली होती. या सर्वांचे चाचणी अहवाल गुरुवारी (दि.28) रात्री उशिरा आले. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

डेअरी मधून जवळील सोसायटीच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व मिठाई खरेदी केली आहेत. अशा नागरिकांना महापालिकेकडून प्राथमिक तपासणी करण्याचे काम सकाळीच सुरू केले आहे. लॉकडाऊनमध्ये डेअरी सुरू होती.

या डेअरीवर अनेक ठिकाणच्या नागरिकांनी दूध, लस्सी, समोसे व मिठाई अशा विविध पदार्थांची खरेदी केलेली आहे. त्यामुळे या ठिकाणाहून खरेदी केलेल्या नागरिकांचा शोध महापालिका कशा पद्धतीने घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या डॉ. स्नेहल काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका डेअरीमधील मालकासह 11 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यामुळे आज सकाळपासूनच डेअरीच्या परिसरातील सोसायटी नागरीकांची प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. यामध्ये कोणाला कोरोनाची लक्षणे असतील तर त्यांची तपासणी करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.