Pimpri News : महापालिकेचे 11 कर्मचारी सेवानिवृत्त, 7 जणांची स्वेच्छानिवृत्ती

एमपीसी न्यूज – सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांनी केलेले अविरत काम आणि परिश्रमातून महापालिकेचा प्रशासकिय पाया अधिक मजबूत झाला. त्यांच्या उत्तम योगदानाबद्दल सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या 11 तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 7 कर्मचा-यांचा सत्कार सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या हस्ते करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास क्रीडा कला व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या सुजाता पालांडे, माजी उपमहापौर महंमद पानसरे, माजी नगरसदस्या अमिना पानसरे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये क्रीडा अधिकारी रझाक पानसरे, मुख्याध्यापिका प्रतिभा ढोकले, मुख्याध्यापक संजीवनी हाके, सिस्टर इनचार्ज निला बनसोडे, भांडारपाल रामदास कांटे, लेखाधिकारी दिलीप ठाकूर, मुख्य आरोग्य निरिक्षक विजय दवाळे, सुरक्षा निरीक्षक मनोहर भोसले, एक्स रे टेक्निशियन नितीश दुबे, उपशिक्षिका शबाना सय्यद, इलेक्ट्रीक मोटार पंप ऑपरेटर संजय कांबळे यांचा समावेश आहे. तर, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्यांमध्ये कार्यालयीन अधिक्षक संजय तापकीर, लेखापाल ज्ञानदेव गराडे, मुख्य लिपिक तानाजी खैरे, ए.एन.एम. पद्मा खाडे, रखवालदार अरुण विठ्ठल चौरे, कचरा कुली चंद्रकांत कांबळे, गटरकुली आनंदा कांबळे यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.