Pune News : कोरोनाच्या नावाखाली ग्राहकांची तब्बल 11 लाखांनी फसवणूक, नेमकं काय घडलं?

एमपीसी न्यूज : टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाकडे हॉलिडे पॅकेजसाठी लाखो रुपये भरल्यानंतर कोरोनामुळे  लॉकडाऊन लागल्यामुळे ट्रीप कॅन्सल झाली. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने पैसे परत न देता सात जणांची 11 लाख 27 हजार रुपयांची फसवणूक केली. 

भूपेश उर्फ विकी बाळकृष्ण ठक्कर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिकाचे नाव आहे. बालाजीनगर येथील के के मार्केटमध्ये त्याचे ऑफिस आहे. याप्रकरणी रणछोड नगिनदास नागर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांच्या साथीदारांनी डिसेंबर 2019 मध्ये भूपेश ठक्कर यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सी मार्फत हॉलिडे पॅकेज बुक केले होते. ठरलेली 11 लाख 27 हजार 800 रुपये आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आरोपीला दिली होती. या सर्व व्यवहाराच्या रितसर पावत्या फिर्यादीकडे आहेत.

दरम्यान कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ट्रीप कॅन्सल झाल्यामुळे फिर्यादी आणि इतर लोकांनी ट्रिपसाठी भरलेले पैसे परत मागितले असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. आणि फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भरलेले 11 लाख 27 हजार 800 रुपये परत न करता अपहार केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.