Pune :  कंपनी सोडून गेलेल्या कामगारांची खोटी पगार बिले काढून केली 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नोकरी सोडून गेलेल्या कामगारांची खोटी पगार बिले काढून कंपनीची तब्बल 10 लाख 88 हजारांची फसवणूक केल्याची घटना सातारा रोडवरील आय.एस.जी. हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस या कंपनीत 1 जानेवारी 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधील घडली.

याप्रकरणी  संदीप नागुरे(वय 38, रा.बालाजीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या एस.जी.हॉस्पिटॅलिटी या कंपनीमध्ये दोघेजण एरिया इंचार्ज म्हणून नोकरीस होते. त्यांच्याकडे कंपनीमध्ये कामगारांची भरती करणे, त्यांच्या हजेरी, गैरहजेरीच्या नोंदी ठेवणे तसेच त्यांचे पगार काढण्यासाठी त्यांच्या हजेरीची माहिती कंपनीच्या मेन कार्यालयात पाठवणे अशी सर्व कामे देण्यात आली होती.परंतु त्या दोघांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने कंपनीतून काम सोडून निघून गेलेल्या कामगारांची  खोटी हजेरी लावून त्यांची पगार बिले काढली व त्याद्व्यारे कंपनीची  तब्बल 10 लाख 88 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.