11 Std Addmission : पुणे, पिंपरी चिंचवडसह सात महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात ; ‘येथे’ करा अर्ज 

शिक्षणमंत्र वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. ; Eleventh admission process started in seven municipal areas including Pune, Pimpri Chinchwad; Apply 'here'

एमपीसी न्यूज – मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळाचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 

https://11thadmission.org.in/ या संकेतस्थळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे.

दहावीच्या निकालानंतर शिक्षण विभागाने तातडीने अकरावी प्रवेश प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात केली. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई एमएमआर क्षेत्र आणि राज्यातील सहा महापालिका क्षेत्रातील तब्बल 1,600 कॉलेजांमधील तब्बल साडे पाच लाख जागासाठीची प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांना घरबसल्या करता येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.