Pimpri: हॉटस्पॉट आनंदनगरसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

दिवसभरात 14 नवीन रुग्णांची नोंद. 11 test positive for coronavirus in Pimpri Chinchwad including from hotspot Anandnagar. Total 14 patients tested positive today from Pimpri Chinchwad

0

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या आनंदनगर झोपडपट्टीसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे आज (शुक्रवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, येरवड्यातील पण वायसीएमएचमध्ये दाखल असलेल्या एकाचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. तर, सकाळीच कुदळवाडी आणि बिजलीनगर येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 14 नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर, नऊ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी महापालिकेने कोरोना संशयितांचे रिपोर्ट तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले होते. त्याचे काही रिपोर्ट सायंकाळी आले आहेत. त्यात हॉटस्पॉट आनंदनगरसह चिखली, भोसरी, रहाटणी, काळेवाडी, दापोडीतील 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

पाच महिला आणि सहा पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, च-होली, यमुनानगर, भोसरी, सांगवी आणि पुण्यातील नाना पेठेतील रहिवासी असे 9 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 78 झाली आहे. तर, आजपर्यंत शहरातील 265  जणांना कोरोनाची लागण झाली असून 160 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील सात आणि शहराबाहेरील नऊ अशा 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

Pimpri: कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत तफावत; वॉररुममधील ‘डॅश बोर्ड’वर वेगळीच आकडेवारी 

आजचा वैद्यकीय अहवाल!

#दाखल झालेले संशयित रुग्ण – 141

# पॉझिटीव्ह रुग्ण – 14

#निगेटीव्ह रुग्ण – 49

#चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 376

#रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 494

#डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 54

#आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 265

# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 78

# शहरातील कोरोना बाधित 20 रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु

# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या –  16

#आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 160

# दैनंदिन भेट दिलेली घरे – 39552

#दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 115139

दापोडी, रहाटणी, चिखली, धावडेवस्तीतील ‘हा’ परिसर सील!

दापोडी, रहाटणी,  चिखली, भोसरी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बॉम्बे कॉलनी दापोडीतील (जामा मशिद दापोडी- कृष्णाई डेअरी-महादेव मंदिर- विठ्ठल तरुण मंडळ दापोडी गावठाण), डेस्टिनेशन मेमोइर चिखलीतील (डेस्टिनेशन मेमोइर सोसायटी हद्द भिंत- फिनो कॉर्नर- क्रिस्टल कॉर्नर),

शिवराजनगर रहाटणीतील (गणपती मंदिर- रॉयल ऑरेंज कौंटी सोसायटी- आकाशगंगा फेज 2- कुणाल मेडिकल, आयुर्वेद-भाग्यलक्ष्मी स्टेशनरी-श्रीराम सुपर मार्केट-वेलकम किराणा स्टोअर्स- गणपती मंदिर), धावडेवस्ती भोसरीतील (गोविंदा सुपर मार्केट-कृष्णा कार डेकोर-वर्षा सिलेक्शन-रिझवान चिकन सेंटर- ज्ञानेश्वरी लेडीज टेलर्स- शुभम मोबाईल शॉपी- भैरवनाश शाळा- गोविंदा सुपर मार्केट)  हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like