Talegaon Dabhade : बाळा भेगडे यांच्या हस्ते कामगारांना घर बांधणीसाठी 30 हजारांचा पहिला हप्ता

एमपीसी न्यूज – अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त बांधकाम कामगारांसाठी मावळ तालुक्यातील पहिल्या ‘अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा’ शुभारंभ पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नोंदणीकृत बांधकाम कामगार लाभार्थ्यांना घर बांधणीसाठी 30 हजारांचा पहिला हप्ता सुपूर्द करण्यात आला.

कामगार विभागाने घरे बांधून देणा-या कामगारांसाठीही आवास योजना असावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुचवले होते. त्यानुसार राज्यातील 3 लाख बांधकाम कामगारांना आवास योजनेचा लाभ देण्याचं संकल्प अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून सुरू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.