Chinchwad : वाहनचोर पुन्हा सक्रिय; शहरातून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे प्रकार मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मधल्या काही दिवसात वाहनचोरी थांबली असल्याने पोलिसांनी निश्वास सोडला होता. मात्र, पुन्हा वाहनचोर शहरात सक्रिय झाले असून चिंचवड, चिखली, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच वाहने चोरून नेली आहेत.

चिंचवड पोलीस ठाण्यात गौरव केशव गायकवाड (वय 26, रा. चिंचवडगाव) यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 3 ऑगस्ट रोजी त्यांनी त्यांचे शेजारी रितेश भोसले यांची 25 हजार रुपये किमतीची पॅशन प्रो मोटारसायकल (एम एच 14 / ई व्ही 4334) कामासाठी वापरायला घेतली. काम झाल्यानंतर रात्री त्यांनी दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

चिंचवड पोलीस ठाण्यात आणखी एक दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. यामध्ये रमेश देविदास शिंगटे (वय 30, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रमेश यांनी त्यांची दुचाकी (एम एच 25 / वाय 5908) 1 जुलै रोजी राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. 2 जुलै रोजी सकाळी ही घटना उकडीस आली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

चिखली पोलीस ठाण्यात हरिश्चंद्र चंद्रकांत वाकचौरे (वय 51, रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 14 / बी डी 6724) बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये लॉक करून पार्क केली. 8 ऑगस्ट रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी 20 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. 9 ऑगस्ट रोजी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

जावेद जब्बार शेख (वय 45, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी रात्री सातच्या सुमारास त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच 14 / एच एच 0787) घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

देहूरोड पोलीस ठाण्यात रोहिणी रमेश मद्रेकर (वय 36, रा. मामुर्डी, देहूरोड) यांनी फिर्याद दिली. रोहिणी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी (दि. 17) रात्री सातच्या सुमारास त्यांची दुचाकी घरासमोर पार्क केली असता अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. आठच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.