Chikhali : दोन मोबाईल चोरट्यांना अटक; नऊ मोबाईल फोन जप्त

एमपीसी न्यूज – चिखली पोलिसांनी दोन मोबाईल चोरट्यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

नितीन आनंद शिंदे (वय 19), रुतीक प्रकाश पालखे (वय 20, दोघे रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे पोलीस चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सी डी सावंत आणि पोलीस शिपाई डोके यांना माहिती मिळाली की, त्रिवेणीनगर येथे तीनजण हातात कोयते घेऊन मोटारसायकलवरून फिरत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शिताफीने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिखली परिसरात नऊ मोबाईल फोन चोरल्याचे कबूल केले.

दोघांना अटक करून नऊ मोबाईल फोन आणि एक दुचाकी असा एकूण 1 लाख 8 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. यामुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like